शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:10+5:302021-07-05T04:11:10+5:30
प्रभाग क्रमांक ९ मधील गंगापूर,धृवनगर, शिवाजीनगर,श्रमिकनगर तसेच सोमेश्वर कॉलनी, कामगारनगर,अशोकनगर आदी भागातील वयोवृध्द, अपंग, ज्येष्ठ नागरिक,महिला आदींसह नागरिकांना ३ ...
प्रभाग क्रमांक ९ मधील गंगापूर,धृवनगर, शिवाजीनगर,श्रमिकनगर तसेच सोमेश्वर कॉलनी, कामगारनगर,अशोकनगर आदी भागातील वयोवृध्द, अपंग, ज्येष्ठ नागरिक,महिला आदींसह नागरिकांना ३ ते ५ किलोमीटर अंतर पायपीट करून लस घ्यायला जावे लागत होते. म्हणून नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तगादा लावून प्रभागात लसीकरण केंद्राची मागणी केली होती. नगरसेवक दिनकर पाटील, युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करुन शिवाजीनगर भागात लसीकरण केंद्राची मागणी लावून धरली होती. अखेर महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिल्याने महापालिकेने बांधलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी नगरसेवक दिनकर पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, नगरसेविका भालेराव, नोडल ऑफिसर डॉ. योगेश कोशिरे, युवा ऊर्जा अध्यक्ष अमोल पाटील, स्टाफ आदीसह उपस्थित होते. युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
फोटो :- प्रभाग क्रमांक ९ मधील शिवाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करतांना स्थायी सभापती गणेश गिते. समवेत दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, डॉ. योगेश कोशिरे, अमोल पाटील आदी.
040721\04nsk_25_04072021_13.jpg
प्रभाग क्रमांक ९ मधील शिवाजीनगर येथे सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करतांना स्थायी सभापती गणेश गीते समवेत दिनकर पाटील,रविंद्र धिवरे,डॉ.योगेश कोशिरे,अमोल पाटील आदी.