१३५ पर्यंत वाढवली लसीकरण केंद्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:16 AM2021-07-31T04:16:31+5:302021-07-31T04:16:31+5:30

नाशिक : महापालिका क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्यानुसार तत्काळ लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. नुकत्याच २१ हजार ...

Vaccination centers increased to 135! | १३५ पर्यंत वाढवली लसीकरण केंद्रे!

१३५ पर्यंत वाढवली लसीकरण केंद्रे!

Next

नाशिक : महापालिका क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्यानुसार तत्काळ लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. नुकत्याच २१ हजार लसी प्राप्त झाल्या असल्याने लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढवून १३५ पर्यंत नेण्यात आली आहे. तसेच पुढील महिन्यात अजून अधिक प्रमाणात लस मिळण्याची शक्यता असल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेला अधिक गती देता येणे शक्य होणार आहे.

महानगराच्या सहाही विभागांत अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, आवश्यक तितक्या मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने काही वेळा लसीकरण प्रक्रियेत खंड पडतो. मात्र आता मनपाच्या १३५ केंद्रांबरोबरच खासगीतील ५१ हॉस्पिटल्सनादेखील परवानगी देण्यात आली आहे. या खासगीपैकी १४ खासगी हॉस्पिटल्सनी त्यांच्याकडेदेखील लसीकरण सुरू केले असल्याने खासगी केंद्रांवरही लसीकरणाला बऱ्यापैकी वेग आला आहे. शासकीय आदेशानुसार ज्यांचे लसीकरणाचे दुसरे डोस प्रलंबित आहेत अशा नागरिकांना त्यातही प्राधान्य दिले जात आहे. त्याशिवाय नाशिक रोडचे कारागृह तसेच मनपा क्षेत्रातील २० पैकी ८ वृद्धाश्रमांतील ज्येष्ठ नागरिकांचेही लसीकरणाचे पहिले डोस पूर्ण करण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार सर्व गर्भवती आणि स्तनदा मातांनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. फक्त गर्भवती महिलांना लस ही केवळ ज्या रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध असतील, तिथेच देण्याचे निर्देश दिले आहेत. तर सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कालिदासनजीकच्या महात्मा फुले कलादालनात लसीकरणाची विशेष सोय करण्यात आली आहे. नजीकच्या काळात बेडवर असलेल्या रुग्णांसाठीदेखील घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधितांची कागदपत्रे तपासून मगच त्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

----------

- डॉ. अजीता साळुंखे, मनपा लसीकरण अधिकारी

--------------

गेस्ट रूमसाठी मुलाखत (३०अजीता साळुंखे)

Web Title: Vaccination centers increased to 135!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.