ग्रामीण भागात पुणे, मुंबईच्या नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:16 AM2021-05-09T04:16:05+5:302021-05-09T04:16:05+5:30

ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता, प्राधान्याने ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब ...

Vaccination of citizens of Pune, Mumbai in rural areas | ग्रामीण भागात पुणे, मुंबईच्या नागरिकांचे लसीकरण

ग्रामीण भागात पुणे, मुंबईच्या नागरिकांचे लसीकरण

Next

ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता, प्राधान्याने ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली. ग्रामीण भागात लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसून, एकीकडे कडक निर्बंध लादले जात असताना दुसरीकडे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता आरोग्य यंत्रणेचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याचा आरोपही करण्यात आला.

चौकट===

अधिकाऱ्यांचे अज्ञान उघड

या बैठकीत आमदार राहुल ढिकले यांनी लसीच्या एका डोसमध्ये किती लसीकरण केले जाते, असा प्रश्न विचारला असता, लसीकरणाचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याला त्याचे नीट उत्तर देता आले नाही. अगोदर पन्नास लस दिले जाते, असे त्यांनी सांगितल्यावर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसीच्या डोसमध्ये प्रत्येकी किती लसीकरण होते. याबाबत पुरेशी माहिती अधिकारी यावेळी देऊ शकले नाहीत.

Web Title: Vaccination of citizens of Pune, Mumbai in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.