डाेस संपल्याने शहरातील लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:01+5:302021-03-19T04:15:01+5:30
१६ जानेवारीपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन लसी सर्वप्रथम शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले होते. ...
१६ जानेवारीपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन लसी सर्वप्रथम शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यावेळी काहींनी रिॲक्शनच्या भीतीने नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट वर्कर्स म्हणजेच पोलीस आणि अन्य महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले तर, तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त परंतु ज्यांना हृदयरोग, रक्तदाब, मूत्रपिंड विकार आहेत अशांनाच नोंदणी करून लस देण्यात येत आहे. सुरुवातीला अनेकांना लसीविषयी शंका असली तरी आता मात्र कोराेनाची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच नागरिक लस घेण्यास उत्सुक असताना दुुसरीकडे मात्र गेल्या तीन ते चार दिवसापासून लस संपल्याचे कारण सांगून ज्येष्ठ नागरिकांना परत पाठविले जात आहे. गुरुवारी(दि.१८)देखील लस संपल्याचे सांगून अनेकांना परत माघारी फिरावे लागले.
यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी कोविशिल्डच्या लस संपल्याचे सांगून दीड लाख लस यापूर्वीच मागविल्याचे स्पष्ट केले. मात्र, यातील काही डाेस शुक्रवारी (दि.१९) येणार असून, ते वितरित करण्यास संपूर्ण दिवस जाणार असल्याने शनिवारी (दि. २१) लसीकरण करता येऊ शकेल, असे सांगितले.
कोव्हॅक्सिन लस
कोट...आणखी २४ खासगी रुग्णालयात लसीकरण
नाशिक शहरात लसीकरणासाठी सुमारे ३६ केंद्रे आहेत. यात महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. परंतु लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणखी २४ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
कोट...
एकीकडे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे मात्र सातपूर परिसरात तिन्ही केंद्रांवर डाेस नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना पायपीट करत परत जावे लागले असे होऊ नये, यासाठी महापालिकेने पुरेसा साठा सर्वच केंद्रांवर करण्याचे नियोजन करावे.
- प्रा. वर्षा भालेराव, नगरसेविका, भाजप