डोस संपल्याने मुलांचे लसीकरण ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 01:32 AM2022-02-16T01:32:05+5:302022-02-16T01:34:33+5:30
लसीकरण सुरू केल्यानंतर पुरेशा प्रमाणात त्यांची डोस पुरेशा प्रमाणात दिला जात नसल्याचे पुन्हा एकदा खंड पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोवॅक्सीनचे डोस संपल्याने १५ ते १८ वयाेगटातील किशोरवयीन मुलांचे देखील लसीकरण ठप्प झाले आहे. बुधवारी (दि.१६) पुणे येथे महापालिकेला डोस मिळणार असले तरी, त्याची संख्या फार नसेल तरीही आता गुरुवारपासून (दि.१७) डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन प्रकारच्या लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नाशिक- लसीकरण सुरू केल्यानंतर पुरेशा प्रमाणात त्यांची डोस पुरेशा प्रमाणात दिला जात नसल्याचे पुन्हा एकदा खंड पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोवॅक्सीनचे डोस संपल्याने १५ ते १८ वयाेगटातील किशोरवयीन मुलांचे देखील लसीकरण ठप्प झाले आहे. बुधवारी (दि.१६) पुणे येथे महापालिकेला डोस मिळणार असले तरी, त्याची संख्या फार नसेल तरीही आता गुरुवारपासून (दि.१७) डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन प्रकारच्या लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी केंद्रशासनाने लसीकरण सुरू केल्यानंतर एप्रिल नंतर मोठ्या प्रमाणात लसींची टंचाई जाणवत होती, तेच आता देखील सुरू झाले आहे. नव्या वर्षात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी बुस्टर डाेस सुरू झाले आणि त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अशाच प्रकारचे डोस देण्यास प्रारंभ झाला. त्याच प्रमाणे १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीनांना देखील बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे या लसीकरणाला प्रतिसाद वाढला. नाशिक शहरातच ५५ हजार ५१६ किशोरवयीनांना पहिला डोस तर ८ हजार ७८१ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस देण्यात आलेल्या डोसचे प्रमाण ६२ टक्के इतके आहे. मात्र, ४४ हजार ५०० मुले पहिल्या डोस पासून आणि ९१ हजार मुले दुसऱ्या डोस पासून वंचित आहेत. किशोरवयीन मुलांना कोवॅक्सीनचाच डोस दिला जात असून गेल्या काही दिवसांत या लसीचे डोसच उपलब्ध होत नसल्याने लसीकरण विस्कळीत झाले आहे.
प्राैढांना देखील दुसरा डोस मिळत नसून त्यांना रोजच केंद्रांवर भ्रमंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर शाळा- महाविद्यालयातील लसीकरण ठप्प झाले आहेत.
कोट...
कोवॅक्सीनचे डाेस संपल्याने लसीकरण होऊ शकत नाही. बुधवारी (दि.१६) दुपारपर्यंत काही प्रमाणात डोस मिळतील. त्यानंतर गुरुवारी (दि.१७) लसीकरण सुरू होऊ शकेल.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा