एसपीएच विद्यालयात विद्यार्थ्यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:20 PM2022-03-29T23:20:04+5:302022-03-29T23:21:08+5:30

मालेगाव : येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक (म्युनिसिपल हायस्कूल) विद्यालयात प्राचार्या कल्पना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.

Vaccination of students in SPH schools | एसपीएच विद्यालयात विद्यार्थ्यांना लसीकरण

एसपीएच विद्यालयात विद्यार्थ्यांना लसीकरण

Next
ठळक मुद्दे१२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या लसीकरणाचे नियोजन

मालेगाव : येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक (म्युनिसिपल हायस्कूल) विद्यालयात प्राचार्या कल्पना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निमा आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिका यांच्या सहकार्याने १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

आरोग्य विभागातील आरोग्य सेविका माया पाटील, आशा सेविका श्रीमती गवांदे व नरगीस लसीकरणासाठी आले होते. एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन करून लसीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यालयात लसीकरण केल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक नितीन सोनवणे, वरिष्ठ लिपिक निंबा पवार, ग्रंथपाल मच्छिंद्र भदाणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Vaccination of students in SPH schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.