लसीकरण हाच कोरोनामुक्तीसाठी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:08+5:302021-06-06T04:12:08+5:30

मोडाळे येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. वडगावकर यांनी सांगितले, कोरोना हा फार मोठा आजार नसून वेळेत उपचार घेतल्यास ...

Vaccination is the only cure for coronavirus | लसीकरण हाच कोरोनामुक्तीसाठी उपाय

लसीकरण हाच कोरोनामुक्तीसाठी उपाय

Next

मोडाळे येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. वडगावकर यांनी सांगितले, कोरोना हा फार मोठा आजार नसून वेळेत उपचार घेतल्यास लवकरात लवकर रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे या आजाराला न घाबरता सुरुवातीला स्वरूप अत्यंत सौम्य लक्षणे असतील तर लवकरात लवकर रॅपीड अँटिजन टेस्ट करून घ्यावी. गावात १०० टक्के लसीकरण झाले तरच गाव कोरोनामुक्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आजपर्यंत मी वीस हजार लोकांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांना भेटलो असून खुल्या जागेत काम केले तर कोरोना होण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली, सामाजिक अंतर ठेवले आणि लसीकरण केले तर कोरोना होणार नाही, असेही अतुल वडगावकर यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, डॉ. उल्हास बोडके यांनीही मनोगत व्यक्त केले.

फोटो- ०५ अतुल वडगावकर

फोटो - मोडाळे येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ. अतुल वडगावकर. समवेत गोरख बोडके, डॉ. उल्हास बोडके आदी.

===Photopath===

050621\05nsk_29_05062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०५ अतुल वडगावकर  फोटो - मोडाळे येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ अतुल वडगावकर. समवेत गोरख बोडके, डॉ. उल्हास बोडके आदी. 

Web Title: Vaccination is the only cure for coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.