लसीकरण केवळ तरुणाईला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 12:59 AM2021-05-03T00:59:19+5:302021-05-03T01:00:18+5:30

शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील केवळ दोनच केंद्रांवर लस मिळू शकणार आहे. 

Vaccination only for youth | लसीकरण केवळ तरुणाईला 

लसीकरण केवळ तरुणाईला 

Next
ठळक मुद्देदुर्भिक्ष्य : शहरात केवळ दोनच केंद्रांवर लस

नाशिक : शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील केवळ दोनच केंद्रांवर लस मिळू शकणार आहे. 
जिल्ह्यात २२४ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यातील केवळ मोजक्याच केंद्रांवर लस मिळू शकली. मात्र, मनपा प्रशासन आणि जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात लसींचा साठाच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी नोंदणी केली तरी लसच उपलब्ध नसल्याने लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया मंदावली आहे. नाशिक शहरात सोमवारीदेखील केवळ पंचवटीचे इंदिरा गांधी रुग्णालय आणि खोले मळ्यातील रुग्णालयातच लसीकरण प्रक्रिया सुरू राहू शकणार आहे. हे लसीकरणदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच मिळणार आहे. दरम्यान नाशिक शहराला केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असून हा साठा अवघ्या तीन दिवसांतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.  

Web Title: Vaccination only for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.