लसीकरणाचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:22+5:302021-07-07T04:18:22+5:30
एस.टी. कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू झालेली असली तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ...
एस.टी. कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू झालेली असली तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना दरमहा सात तारखेला वेतन दिले जाते. तत्पूर्वी त्यांच्या पगाराची स्लीपही मिळते. मात्र, कर्मचाऱ्यांना अद्याप वेतनाची स्लीप मिळालेली नाही. त्यामुळे काहीशी अनिश्चितता आहे. राज्य शासनाने महामंडळाला ६०० कोटी आर्थिक अनुदानापैकी ३०० कोटी मिळाले असून, आणखी ३०० कोटी बाकी आहेत. तेही अद्याप मिळालेले नसल्याने वेतन होणार की नाही अशी कर्मचाऱ्यांना चिंता लागली आहे.
महसूल अनुकंपाधारक प्रतीक्षेतच
नाशिक : महसूल विभागातील अनुकंपाधारक गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्यात येऊन पात्रतेनुसार त्यांना पदोन्नतीही देण्यात आलेली असताना महसूल विभागातील कर्मचारी मात्र अजूनही यादीतच अडकले आहेत. यादीचा प्राधान्यक्रम कसा असणार याबाबत अनुकंपाधारक सातत्याने प्रश्न उपस्थित करीत असतानाही त्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. अनेक अनुकंपाधारकांची वयेामर्यादाही उलटून गेली आहे. वर्ग चारची अनुकंपा भरती करण्यात यावी, अशी मागणी अनुकंपाधारक राजाभाऊ शेरताटे यांनी केली आहे.
शाळाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण
नाशिक : अनुसुचित जातीचा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांन नारनवरे यांनी दिल्या आहेत. सामाजिक न्याय विभागातील नाशिक विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांशी चर्चा करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत उपायोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
(गुड मॉर्निंग नाशिकसाठी)