सिन्नर शहरासह ग्रामीण भागात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:12 AM2021-04-05T04:12:56+5:302021-04-05T04:12:56+5:30
सिन्नर शहरासह ग्रामीण भागात लसीकरण सिन्नर : कोरोना संसर्गामुळे शहरासह तालुक्यात लसीकरणासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, अशा पध्दतीने ...
सिन्नर शहरासह ग्रामीण भागात लसीकरण
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे शहरासह तालुक्यात लसीकरणासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, अशा पध्दतीने नियोजन करण्यात आले असून शहरवासीयांना ग्रामीण रुग्णालयात व तालुक्यातील नागरिकांसाठी ठिकठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
सिन्नरला कोरडी रंगपंचमी
सिन्नर : शहर व परिसरात रंगपंचमी उत्सव अगदी साध्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. कोरोनामुळे शहरातील चौका चौकात केले जाणारे रंगाचे हौद यावेळी दिसले नाही. मित्र मंडळांनीही सार्वजनिक रंगपंचमी ऐवजी कोरड्या रंगाने रंगपंचमी उत्सव साजरा केला.
नांदूरशिंगोटे परिसरात उकाडा वाढला
नांदूरशिंगोटे : गेल्या आठवड्यापासून नांदूरशिंगोटे येथे व परिसरात उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे शीतपेय, रसवंती गृहांमध्ये कमी अधिक प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. वाढत्या कोरोना बरोबरच तापमानही वाढत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
सिन्नरला शिवसेनेतर्फे शिवरायांना अभिवादन
सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या निवडक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शिवजन्मोत्सव साजरा केला. वाजे यांच्या संपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
सांगळे, बलक यांना कृषी भूषण पुरस्कार
सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथील प्रगतशील शेतकरी कारभारी महादू सांगळे व भागवत विठोबा बलक यांना नुकताच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सांगळे व बलक यांचा सत्कार करण्यात आला.