ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:00+5:302021-02-05T05:49:00+5:30
मालेगाव शहरात सार्वजनिक रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्र सोयगांव, कॅम्प, निमा व रमजानपुरा अशा पाच लसीकरण केंद्रांमार्फत १६ जानेवारीपासून ...
मालेगाव शहरात सार्वजनिक रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्र सोयगांव, कॅम्प, निमा व रमजानपुरा अशा पाच लसीकरण केंद्रांमार्फत १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. आता तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १ हजार ३४१ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला २५जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. एकूण १ हजार २४० शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांसह १०७ खासगी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ यासाठी सामान्य रुग्णालय, मालेगाव येथे डॉ. हितेश महाले व डॉ. शैलेश निकम यांच्या निरीक्षणाखाली लसीकरण केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे अशा आरोग्य कर्मचाऱ्यांनी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.