कोनांबे उपकेंद्रात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:25+5:302021-04-09T04:14:25+5:30
---------------------- सिन्नरला रक्तदान शिबिर सिन्नर : कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. ...
----------------------
सिन्नरला रक्तदान शिबिर
सिन्नर : कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कै. गंगाधर दादा चोथवे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने (दि. ९) सकाळी १० वाजता सिन्नर सार्वजनिक वाचनालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुल चोथवे, संजय चोथवे यांनी दिली.
------------------
व्यायामशाळा इमारतीसाठी निधी
सिन्नर : ग्रामीण भागातील नागरिकांना व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून व्यायामशाळा इमारत, साहित्य व ग्रीन जिम आदी कामांसाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा मंजूर झाला आहे. क्रीडा विभागाने नुकताच प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
-----------------------
दुकाने बंद, मात्र रस्त्यावर वर्दळ
सिन्नर : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. अजूनही नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, आता तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवली गेली. कामाशिवाय बाहेर पडू नका, मास्क व सुरक्षित अंतर या बाबी कटाक्षाने पाळा, असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडेे यांनी केले आहे.
----------------
चढत्या उष्णतेचा पशुधनावर परिणाम
सिन्नर : सूर्य दिवसेंदिवस तापत असल्याने उष्णतेचा पारा चढता असून, त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर देखील होण्याची शक्यता आहे. पशुधन सावलीलाच बांधावे. त्यांना जमेल तसा हिरवा चारा द्यावा. दुपारी जनावरांच्या पाठीवर माथ्यावर पाणी टाकावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे.
------------------
विलगीकरण केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
सिन्नर : तालुक्यातील विंचूर दळवी येथे ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रास नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. याठिकाणी उपलब्ध सुविधा, इमारत, पाणी, स्वच्छतागृहाची उत्तम सोय केल्याने समाधान व्यक्त केले.