चांदवड उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:26 AM2021-03-04T04:26:15+5:302021-03-04T04:26:15+5:30
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड -१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, कोविड ...
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड -१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, कोविड लसची नोंदणी करण्यासाठी असणाऱ्या ॲपमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे व कोविड लसीचे तालुकाप्रमुख डॉ.पुनीत डोनर यांनी ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ ताटकळत उभे राहू नये यासाठी लसीकरण करून त्यांची नावे रजिस्टरला नोंदवून घेतली आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळ सकाळी ताटकळत उभ्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस प्राप्त झाल्याने आनंदाचे वातावरण होते. दि. १ मार्च रोजी दिवसभरात एकूण ७२ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळीभोई , वडनेरभैरव, उसवाड, काजीसांगवी, तळेगावरोही येथेही लसीकरण सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पेन्शन कागदपत्रे यापैकी एक सोबत आणावे, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.