मालेगाव तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:53+5:302021-03-04T04:24:53+5:30
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, दाभाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र, वडनेर खाकुर्डी या दोन केंद्रांवर सोमवार, १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला ...
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, दाभाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र, वडनेर खाकुर्डी या दोन केंद्रांवर सोमवार, १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दर आठवड्याच्या बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, सौंदाणे, निमगाव, कळवाडी, चिखल ओहोळ व वडनेर येथे लसीकरण होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ. निकम यांनी कळविले आहे
ज्या नागरिकांचे वय ४५ पेक्षा अधिक आहे व ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, अशा नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत असून, त्यांनी स्वत:चे आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा व दीर्घकालीन आजार असलेल्या वैद्यकीय दाखल्यासह लसीकरणासाठी केंद्रावर उपस्थित राहावे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह दीर्घकालीन आजार असलेल्या सहव्याधी रुग्णांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही डॉ. निकम यांनी केले आहे.