जिल्ह्यात सात लाख बालकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:32 AM2018-12-13T01:32:39+5:302018-12-13T01:33:00+5:30
जिल्ह्णात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्णातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लक्ष १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर-रूबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे.
नाशिक : जिल्ह्णात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्णातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लक्ष १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर-रूबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्णाचे ३६.४९ टक्के काम झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ५ लाख ४०७ मुला-मुलींना लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. मालेगाव महानगरपालिकेमध्ये काम कमी झालेले असून, याबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी औरंगाबादकडे जात असताना सोमवारी (दि. १०) नाशिकमध्ये थांबून मोहिमेचा आढावा घेतला. याप्रसंगी नाशिक विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.
विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी तातडीने मालेगाव येथे जाऊन महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य शिक्षण व महिला बालकल्याण विभागप्रमुख व मोहिमेत सक्रि य संस्थांची सभा घेतली व मार्गदर्शन केले.
अतिरिक्त संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी मालेगाव येथे जाऊन महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी व मोहिमेत सहभागी असलेल्या संस्था, शाळा यांच्या सर्व प्रतिनिधींची सभा घेऊन मोहीम यशस्वीतेसाठी उपाययोजना सुचविल्या. जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात नियोजनानुसार काम सुरू असून, मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले. जिल्हा रु ग्णालय व ग्रामीण रु ग्णालय यांच्यामार्फत ६६ हजार ६७२ मुला-मुलींना लस देण्यात आली असून, नाशिक महानगरपालिका अंतर्गत १ लक्ष १४ हजार ८६४ मुला-मुलींना लस देण्यात आली आहे. मालेगाव महानगरपालिका अंतर्गत २८ हजार ९५९ मुला-मुलींना लस टोचण्यात आली.