फलकाद्वारे चिमुकल्यांची गोवर आणि रुबेला लसीकरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:46 PM2018-11-27T17:46:20+5:302018-11-27T17:46:35+5:30
सिन्नर : मविप्र समाज संंचलित अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार या संकुलात चिमुकल्यांनी फलकाद्वारे गोवर आणि रुबेला लसीकरण रॅलीद्वारे जनजागृती केली.
सिन्नर : मविप्र समाज संंचलित अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार या संकुलात चिमुकल्यांनी फलकाद्वारे गोवर आणि रुबेला लसीकरण रॅलीद्वारे जनजागृती केली.
अभिनव बालविकास मंदिरातील चिमुकल्यांची जनजागृती रॅली शहरातील नाशिक वेस, बाजार पेठ, चौक मार्ग, नवापूल या मार्गावर काढण्यात आली. अभिनव बालविकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक संगीता आव्हाड यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात करण्यात आली.
सिन्नर शहरातून रॅली काढतांना चिमुकल्यांनी गोवर आणि रूबेला यांचे फलक हातात घेऊन घोषवाक्य म्हटली. ‘बाळ राहील सदा गुटगुटीत हेच लसीकरण याचे गुपित, गोवर रूबेला पळून लावू या, त्याला लसीकरणाला साथ देऊ या, कर्तव्यदक्ष नागरिक व पाल्याचे लसीकरण करून घ्या, लसीकरणाला साथ देऊ देश गोवर रूबेला मुक्त करु या, यशस्वी करु गोवर रूबेला अभियान याने वाढेल निरोगी भारताची शान असे संदेश चिमुकल्यांनी फलकाद्वारे दिले. एक राष्टÑव्यापी अभियान देशभरात राबविले जात आहेत.
नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर आणि रूबेला लस द्यावी व आपल्या पाल्याचे आरोग्य चांगले राखावे असे आवाहन संगीता आव्हाड यांनी केले. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरी काढत चिमुकल्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले. रॅलीमध्ये सुमारे ७०० विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. यामध्ये स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. या जनजागृती रॅलीला संस्थेचे संचालक हेमंत वाजे, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक सुजाता भगत यांचे मार्गदर्शन लाभले.