खासगी रुग्णालयात दुसऱ्या दिवशी लसीकरण बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:11+5:302021-03-04T04:25:11+5:30
शासनाने गेल्या १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंट वॉरियर म्हणजेच महापालिका आणि पोेलीस कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लस दिली जात ...
शासनाने गेल्या १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंट वॉरियर म्हणजेच महापालिका आणि पोेलीस कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यानंतर सोमवारपासून (दि. १) ज्येष्ठ नागरिक आणि कोमार्बिड म्हणजेच व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १) महापालिकेच्या तीन रुग्णालयांत मिळून ६८ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, शासनाच्या सूचीतील एकाही खासगी रुग्णालयाने सुरुवात केली नव्हती. मंगळवारी (दि. २) सलग दुसऱ्या दिवशीदेखील खासगी रुग्णालयात लसीकरणदेखील बंद होते. त्यामुळे अखेरीस महापालिकेला अखेर या रुग्णालयाच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना पाचारण करून बैठक घेतली. या रुग्णालयांची यादी शासनाने दिली असली तरी त्यांच्याकडे पुरेशी तयारी नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना तयारीसाठी दोन दिवस वेळ देण्यात आला आहे.
या रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांना लसीकरण कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे बुधवारी (दि. ३) महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयांना भेटी देणार असून त्यानंतर एक-दोन दिवसात खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
इन्फो...
मनपाची लसीकरण केंद्रे वाढणार
महापालिकेच्या बिटको आणि न्यू बिटको तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस आणि अन्य महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आणखी आता शहरातील पाच ते सहा रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.