कारवाई होत नाही तोपर्यंत लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:08+5:302021-09-22T04:16:08+5:30
येवला : लसीकरणादरम्यान सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. सदर घटनेचा ...
येवला : लसीकरणादरम्यान सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. सदर घटनेचा येथील आरोग्य कर्मचारी संघटना, हिवताप कर्मचारी महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
तहसीलदार प्रमोद हिले, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. पास्तेप्रकरणी मारहाण, शिवीगाळ करणाऱ्यांना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत लसीकरण बंद करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. लसीकरण मोहिमेदरम्यान पोलीस बंदोबस्त देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर आर.एस. खैरे, एम. पी. शेरेकर, एस. बी. पैठणकर, के. पी. भामरे, डॉ. जितेंद्र पगार, यू.ए. महाले, जी.जी. पालवे आदींसह पदाधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो- २० येवला लसीकरण
येवला गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांना निवेदन देताना आरोग्य कर्मचारी.
-----------------
200921\305420nsk_56_20092021_13.jpg
फोटो- २० येवला लसीकरण