पांढरुण शाळेत आदिवासी बांधवांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:09+5:302021-08-14T04:18:09+5:30
दरवर्षी शाळेमध्ये आदिवासी दिनानिमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, परंतु यावर्षी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये कोविड प्रतिबंधक ...
दरवर्षी शाळेमध्ये आदिवासी दिनानिमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, परंतु यावर्षी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले होते. सदर लसीकरणाचा लाभ गावातील अनेक आदिवासी बांधवांना देण्यात आला. सदर लसीकरणासाठी डॉ. प्रांजल पाटील, डॉ. महाजन, आरोग्य सेवक डी. के. बनकर, आशा माता तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक ए. एच. निकम, व्ही. पी. पवार, अधीक्षक एम. आर. पाचे, श्रीमती आर. डी. देवरे, एम. एस. नजन, बी. के. सूर्यवंशी, के. एन. बागुल, डी. जे. हिरे आदींसह शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो- १३ मेशी १
पांढरुण-देवपूरपाडे शासकीय आश्रमशाळेत आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी झालेले आदिवासी बांधव.
130821\13nsk_22_13082021_13.jpg
पांढरूण-देवपूरपाडे शासकीय आश्रमशाळेत आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित कोविड लसीकरण मोहीमेत सहभागी झालेले आदिवासी बांधव.