पेठ तालुक्यात लस आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:58+5:302021-07-04T04:10:58+5:30
पेठ : कोरोना साथ रोगाची भीती, लसीकरणाबाबत गैरसमज व अफवांमुळे आदिवासी भागात नागरिक लस टोचून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने ...
पेठ : कोरोना साथ रोगाची भीती, लसीकरणाबाबत गैरसमज व अफवांमुळे आदिवासी भागात नागरिक लस टोचून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी पेठ तालुक्यात महसूल व आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार करून नागरिकांसाठी महसुली गावात लस उपलब्ध करून दिल्याने १८ वर्षांवरील युवकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांच्या संकल्पनेतून कोरोना लसीकरणाबाबत अज्ञान, दळणवळणाचा अभाव व नागरिकांची उदासीनता यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्र व महसुली गावात आरोग्य पथकामार्फत २८ जून ते ३१ जुलै दरम्यान लसीकरण मोहीम राबवण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन लस न घेणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक गावात दररोज १०० पेक्षा अधिक लसीकरण केले जात असून यामध्ये युवकांचा सहभाग असल्याचे दिसून येते.
----------------
शासकीय कर्मचारी करतात जनजागृती
सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन लसीकरणाची टक्केवारी वाढावी यासाठी गावस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवक यांच्या मार्फत जनजागृती केली जात असून प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे.
--------------------------
पेठ तालुक्यात लसीकरण मोहिमेचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला असून सध्या शेतीची कामे सुरू असल्याने नागरिकांना वेळ व पैसे खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी येऊन लस घेणे शक्य होत नसल्याने प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबवण्यात येत असल्याने लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे.
- संदीप भोसले, तहसीलदार पेठ
--------------
लसीकरण मोहीम
ग्रामीण रुग्णालय -1
प्राथमिक आरोग्य केंद्र -7
उपकेंद्र -29
महसुली गावे -145
------------------
हनुमाननगर, ता. पेठ येथे एकाच दिवशी १०० नागरिकांनी लसीकरण करून दिलेला प्रतिसाद. (०३ पेठ १)
030721\03nsk_13_03072021_13.jpg
०३ पेठ १