जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार लसीकरणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:39+5:302021-04-21T04:15:39+5:30

लसीकरणासाठी जिल्हा परिषद शाळा निवडतांना शाळेची इमारत सुस्थितीत असावी. त्यामध्ये इंटरनेटची सुविधा, सद्यस्थितीत लसीकरण मोहिम केंद्र चालू ...

For vaccination in Zilla Parishad schools | जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार लसीकरणासाठी

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार लसीकरणासाठी

googlenewsNext

लसीकरणासाठी जिल्हा परिषद शाळा निवडतांना शाळेची इमारत सुस्थितीत असावी. त्यामध्ये इंटरनेटची सुविधा, सद्यस्थितीत लसीकरण मोहिम केंद्र चालू असलेल्या प्राथमिक केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या शाळेची निवड करण्यात यावी. तसेच लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेअंतर्गत मोठी लोकसंख्या उपलब्ध असलेल्या शाळेची निवड करण्यात यावी. मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणासाठी शाळा निवडतांना पुरेशा जागेची उपलब्धता, प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्षाचे नियोजन करण्यात यावे.

लसीकरण मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्यांनी लसीकरणाचे दिवस आवश्यकतेनुसार ठरवावे. लसीकरण सत्राच्या दिवशी वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रात उपलब्ध राहणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी गावनिहाय व दिवसनिहाय कृती आराखडा तयार करण्यात यावा. तसेच लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. परंतु ग्रामीण भागात शेतीची कामे व बराचसा मजूर वर्ग असल्याने आवश्यकता असल्यास लसीकरणाची वेळ लाभार्थ्यांच्या कामानुसार सोयीनुसार ठेवण्यात यावी. मिसाळ यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

कोविडची सद्यस्थिती पाहता लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारे उद्घाटन समारंभ न करता व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Web Title: For vaccination in Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.