किरकोळ कारणावरून वडाळा चौकात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:37 AM2018-10-12T00:37:51+5:302018-10-12T00:39:20+5:30
दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शौकत याने फायटरने मोहम्मदची हनुवटी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला.
इंदिरानगर : दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शौकत याने फायटरने मोहम्मदची हनुवटी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळागाव परिसरातील खंडोबा चौक हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. या चौकापासून काही मीटरवर वडाळा पोलीस चौकी आहे; मात्र ही चौकी असून नसल्यासारखी झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.९) येथील एका हॉटेलसमोर फिर्यादी ओवेस व जलाल हे दोघे चहा पिण्यासाठी संध्याकाळी आले होते. यावेळी संशयितांनी ‘तू माझ्या बहिणीला शिवीगाळ का केली’? असा प्रश्न उपस्थित करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बंटी याने रिंगपाणा व शौकतने फायटरचा वापर करत दोघांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. मोहम्मदची हनुवटी फुटल्याने रक्तबंबाळ झाला व बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती त्याचे वडील ओवेस यांना समजताच ते म्हशीच्या गोठ्यावरून तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी अवस्थेत मुलाला उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या रिक्षाचालकासोबत वाद झाला तो एका संशयिताचा दाजी असल्याचे समजते. या घटनेवरून पुन्हा गुन्हेगारी घटनांनी वडाळागावात डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. संशयित शौकतवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहे. तसेच बंटी शेख याची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे.
गुन्हा दाखल
या दोघा सराईत गुन्हेगारांवर यापूर्वी विविध प्रकरचे गुन्हे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलीस चौकीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहारवडाळा पोलीस चौकी नावालाच उरली आहे. चौकीचे कु लूप अल्पवेळ उघडते. या चौकीत तक्रारींचा निपटारा कमी अन् ‘अर्थ’पूर्ण व्यवहार अधिक होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. वडाळा पोलीस चौकीचे सक्षमीकरण करणे गरजेचे असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.