वडाळीभोईला शिवायण संगीत चरित्र

By admin | Published: November 14, 2016 12:10 AM2016-11-14T00:10:25+5:302016-11-14T00:08:07+5:30

वडाळीभोईला शिवायण संगीत चरित्र

Vadali Bhoila Vaidyan Music Character | वडाळीभोईला शिवायण संगीत चरित्र

वडाळीभोईला शिवायण संगीत चरित्र

Next

चांदवड : वडाळीभोई येथील विनता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव सांगता समारोपानिमित्त दि. १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान येथील सोसायटी मैदानावर दररोज सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत शिवशाहीर विजय तनपुरे यांचे शिवायण या छत्रपती शिवाजी महाराज संगीत चरित्र कथामालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन अहेर, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप अहेर यांनी दिली. या कथामालेत सोमवारी (दि. १४) शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र व किल्ले शिवनेरी, शिवजन्म, दि. १५ रोजी बालपण दि. १६- दादाजी कोंडदेव यांचा मृत्यू, पुरंदर विजय, विवाह सोहळा, जावळी काबीज, कल्याणच्या खजिन्याची लूट, दि. १७- प्रतापगडचा रणसंग्राम- अशी लढली पावनखिंड व बाजीप्रभू शौर्यगाथा, दि. १८- शाहिस्तेखानाची बोटे तोडली व पुरंदरचा तह, दि. १९- आग्य्राहून सुटका व गड आला पण सिंह गेला तसेच प्रतापराव गुजर शौर्यगाथा,
दि. २०- शिवराज्याभिषेक असे कार्यक्रम होणार आहेत. रसिक श्रोत्यांना भुरळ पाडणारा ऐतिहासिक घटना पोवाड्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार असून, विनता पतसंस्थेच्या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Vadali Bhoila Vaidyan Music Character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.