वडाळीभोईत रोगनिदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:15 AM2018-03-27T00:15:44+5:302018-03-27T00:15:44+5:30

येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल संचलित श्रीमती के.बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व आर. पी. चोरडिया हॉस्पिटलच्या वतीने संस्थेचे संस्थापक कर्मवीर केशवलाल हरकचंद आबड यांच्या स्मृतिदिनानिमित्त वडाळीभोई येथे मोफत रक्तशर्करा तपासणी, सर्वरोगनिदान शिबिर व होमिओपॅथिक वैद्यकीय उपचार शिबिर घेण्यात आले.

 Vadali Bohit Prognosis Shibir | वडाळीभोईत रोगनिदान शिबिर

वडाळीभोईत रोगनिदान शिबिर

googlenewsNext

चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल संचलित श्रीमती के.बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व आर. पी. चोरडिया हॉस्पिटलच्या वतीने संस्थेचे संस्थापक कर्मवीर केशवलाल हरकचंद आबड यांच्या स्मृतिदिनानिमित्त वडाळीभोई येथे मोफत रक्तशर्करा तपासणी, सर्वरोगनिदान शिबिर व होमिओपॅथिक वैद्यकीय उपचार शिबिर घेण्यात आले.  शिबिराचे उद्घाटन वडाळीभोईच्या सरपंच अनिता सुखदेव जाधव, उपसरपंच निवृत्ती घाटे व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झाले.  शिबिरात बदलत्या वातावरणानुसार होणारे संसर्गजन्य व साथीचे आजार व त्याकरिता होमिओपॅथिक वैद्यकीय उपचार पद्धतीचे महत्त्व, उपचारादरम्यान व नंतर घ्यावयाची काळजी, विविध हाडांचे आजार व व्यायाम याबाबतची सर्व शास्त्रीय माहिती तसेच दर बुधवारी होमिओपॅथिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. अजय दहाड यांनी दिली.  या शिबिरात डॉ. अनघा कुलकर्णी, डॉ. शत्रुघ्न त्रिपाठी, डॉ. संदीप पारीक यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मदतीने ९७ रुग्णांची तपासणी करून उपचार केले.

Web Title:  Vadali Bohit Prognosis Shibir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.