वडनेर भैरवच्या सलादेबाबा मंडळास पुरस्कार

By admin | Published: April 24, 2017 01:31 AM2017-04-24T01:31:59+5:302017-04-24T01:32:12+5:30

वडनेर भैरव : लोकमान्य महोत्सवअंतर्गत तालुका ते विभाग पातळीवर गणेशोत्सव अभियानाच्या या वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला

Vadenar Bhairav's Saladbach Mandalas Award | वडनेर भैरवच्या सलादेबाबा मंडळास पुरस्कार

वडनेर भैरवच्या सलादेबाबा मंडळास पुरस्कार

Next

वडनेर भैरव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य महोत्सवअंतर्गत तालुका ते विभाग पातळीवर गणेशोत्सव अभियानाच्या २०१६ या वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे संपन्न झाला. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील सलादेबाबा कला, क्र ीडा मंडळास जिल्हास्तरीय तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कार सन्मानित करण्यात आले. सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह व पन्नास हजार रुपये रोख असे पारितोषिकाचे स्वरूप होते. हा सन्मान चांदवड तालुक्याला प्रथमच मिळाला.
नाशिक विभाग पुरातत्व विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील नियोजन भवन येथे हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
सलादेबाबा ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे, संस्थापक सुरेश सलादे, राजमुद्रा ग्रुपचे समाधान साबळे, आकाश पवार, सिद्धेश शिंदे, प्रथमेश अहेर, राहुल गायकवाड, रोहन गायकवाड, अरबाज पटेल, हर्षल तिडके, तुषार सगर, अजिंक्य सलादे, संकेत निखाडे, सूरज तिडके, उत्तम तिडके, शंकर देवरे यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, नाशिक पुरातत्व विभागाचे सहा. संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, सांस्कृतिक संचालनालय औरंगाबाद लेखाधिकारी, तंत्र सहायक अनिल गोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Vadenar Bhairav's Saladbach Mandalas Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.