वेतन कराराबाबत दिवाळीपर्यंत निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:17 AM2017-07-31T01:17:14+5:302017-07-31T01:17:21+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत दिवाळीपर्यंत कराराबाबतचा निर्णय घ्या, असे अल्टिमेटम दिले.
नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत दिवाळीपर्यंत कराराबाबतचा निर्णय घ्या, असे अल्टिमेटम दिले. मेळा स्थानकातील बसपोर्ट कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात परिवहनमंत्री दिवाकर रावते बोलत होते. एस.टी. कर्मचाºयांचा वेतन करार संपल्यानंतर अद्याप नवीन करार झालेला नाही. कर्मचाºयांच्या वेतनाबाबत महामंडळ प्रशासन आणि एस. टी. कामगार संघटना यांना निर्णयाचा अधिकार आहे. परंतु यंदा कामगार संघटनेने करार नको तर राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणेच एसटीतील कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी भूमिका घेतली आहे. तर उर्वरित १३ संघटनांनी कराराला तयारी दर्शविली आहे. या वादामुळे अद्यापही कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. परिवहनमंत्री रावते नाशिकमध्ये नेमके काय भूमिका मांडतात याकडे तमाम एस. टी. कामगारांचे लक्ष लागले होते. यावेळी रावते यांनी सांगितले की, कराराबाबत दिवाळीपर्यंत सकारात्मक निर्णय घ्या, योग्य निर्णय घेतल्यास कुणीही निराश होणार नाही, कुणालाही कमी पडू देणार नाही; मात्र हट्ट करू नका. हट्ट केला तर सरकारकडे हक्काने काहीच मागता येणार नाही. कर्मचाºयांच्या मेहनतीचा सन्मान झालाच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
महामंडळ तोट्यात असताना महामंडळाने शेतकºयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीसाठी पाच कोटी रुपये निधी दिल्याची घोषणा केली होती. यासाठी आता कर्मचाºयांच्या वेतनातून कपात होणार अशी चर्चा कामगारांमध्ये असतानाच रावते यांनी याचा बोजा कर्मचाºयांवर पडणार नसल्याचे जाहीर करून कर्मचाºयांना दिलासाही दिला.
रावतेंची नाराजी
राज्यातील महत्त्वाकांक्षी बसपोर्ट कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाविषयी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळाच्या अधिकाºयांविषयी नाराजी व्यक्त केली.