वागदर्डीत शेतीच्या वादावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:19+5:302021-07-28T04:14:19+5:30
चांदवड : तालुक्यातील वागदर्डी येथे शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याने चांदवड पोलीस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या ...
चांदवड : तालुक्यातील वागदर्डी येथे शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याने चांदवड पोलीस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याबाबत पहिली फिर्याद रूपेश साईराम झाल्टे यांनी दिली. त्यात म्हटले आहे की, अंबादास एंडाईत, सुभाष एंडाईत, साहेबराव एंडाईत, ज्ञानेश्वर एंडाईत, दादाभाऊ एंडाईत, कोंड्याबाई एंडाईत, संगीता एंडाईड (सर्व रा. वागदर्डी, ता. चांदवड) यांनी रुपेश झाल्टे हे शेतगट नंबर १९२ मध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने लेव्हींग करीत असताना वरील सात जणांनी गैरकायदा मंडळी जमवून एकत्र येऊन हातात काठ्या, गज , कुऱ्हाडीच्या दांड्याने रुपेशचा भाऊ गोपीनाथ झाल्टे व प्रकाश झाल्टे यांना डोक्यावरए हातावर मारून डोके फोडून दुखापत केली. घरातील बहीण, भाऊ व इतर कुटुंबीयांना मारहाण केलीए अशी फिर्याद दिलीण तर दुसरी फिर्याद ज्ञानेश्वर अंबादास एंडाईत यांनी दिली. त्यांनी ज्ञानेश्वर काजळे, लाला काजळे, श्यामराव झाल्टे, यादव झाल्टे, खंडू झाल्टे, गोपीनाथ झाल्टे, रूपेश झाल्टे (सर्व रा. वागदर्डी) यांनी शेताजवळ गैरकायद्याची मंडळी जमवून हातात टॉमी , गज व काठ्या घेऊन वागदर्डी शिवारात भडाणो रोडलगत असलेल्या शेत जमिनीचा दावा चालू असलेल्या पूर्वी वहिवाट गटाचा रस्ता नांगरून टाकल्याने विचारण्यास गेले असता मारहाण करून जबर दुखापत केली. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दोन्ही कुटुंबांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. आर. पवार करीत आहेत.