वंचित बहुजन आघाडीतर्फे येवला तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 07:04 PM2019-06-17T19:04:34+5:302019-06-17T19:05:08+5:30
येवला : जगातील अनेक लोकशाही देशांनी इव्हीएम मशीन नाकारले असतांना सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध असलेल्या भारत देशात वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने इव्हीएम मशीनचा स्वीकार केला आहे,असा आरोप करीत आगामी सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावीया मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी इव्हीएम हटाव, देश बचाव घंटानाद आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात आले.
राज्यातील सर्व ४८ मतदारसंघामध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येत आहे. २२ मतदारसंघामध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे.उर्वरित २६ मतदार संघामध्ये मतदान करणा-यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे.निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळून आली आहे.
तहसीलप्रांगणात बोलताना भाऊसाहेब अहिरे यांनी सांगितले की ,प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांच्या संख्येमध्ये तफावत येण्याचे नेमके कारण काय ? याचे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दयावे. आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावी.
यावेळी शहराध्यक्ष संदिप जोंधळे,विलास देहाडे, भानुदास पठारे,सविता धिवर,रेखाताई साबळे,भगवान रसाळ,गौतम घोडेराव,हमजा भाई,दयानंद जाधव,अविनाश धिवर ,समाधान धिवर,अशोक घोडेराव,शेरु भाई मोमीन, पंचम साळवे, प्रभाकर गायकवाड, संजय गरु ड, सिद्धार्थ निकम, ज्योती जगताप, नसीम शहा, शेहनज अजगर शहा,आशाबाई गुंजाळ,जयप्रकाश वाघ, पोपट वाघ आदींसह वंचित बहुजन आघाडी,भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर घंटानाद आंदोलनास काँग्रेसचे शहराध्यक्ष नानासाहेब शिंदे, लालसेनाचे प्रदेशाध्यक्ष कॉ. जितेंद्र गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव,रिपब्लिकन सेनेचे दिपक लाठे, छावा लभान क्र ांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष मयराम नवले,एम आय एमचे कार्यकर्ते जमील पटेल,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांनी व्यक्त केला.