वाजगाव ग्रामपंचायतीला पित्याच्या स्मरणार्थ वैकुंठरथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 04:18 PM2019-08-12T16:18:01+5:302019-08-12T16:18:24+5:30

सामाजिक पुढाकार : देवरे कुटुंबीयांकडून लोकार्पण

Vaikuntharath in remembrance of the Father | वाजगाव ग्रामपंचायतीला पित्याच्या स्मरणार्थ वैकुंठरथ

वाजगाव ग्रामपंचायतीला पित्याच्या स्मरणार्थ वैकुंठरथ

googlenewsNext
ठळक मुद्देकडू अहिलाजी देवरे यांचे गतवर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी त्यांच्या पत्नी श्रीमती पार्वताबाई देवरे यांच्या हस्ते देवरे कुटुंबीयांकडून वैकुंठरथाचे लोकार्पण करण्यात आले.

देवळा : सामाजिक भावनेतून वाजगाव येथील दिवंगत कडू देवरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी गावाला दिलेल्या वैकुंठरथाचे लोकार्पण श्रीमती पार्वताबाई देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाजगाव हे सामाजिक बांधिलकी जपणारे गाव. सहा वर्षापूर्वी येथील दिनकर आनंदा देवरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वखर्चाने वाचनालय सुरू केले होते. दरम्यान, एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर स्मशानभूमी दूर अंतरावर असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना देखील मनस्ताप होतो. या बाबींचा विचार करून वाजगाव येथील कडू अहिलाजी देवरे यांचे गतवर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी त्यांच्या पत्नी श्रीमती पार्वताबाई देवरे यांच्या हस्ते देवरे कुटुंबीयांकडून वैकुंठरथाचे लोकार्पण करण्यात आले. वाजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापू देवरे, ग्रामसेवक जे. व्हि. देवरे यांचेकडे हा वैकुंठ रथ सोपविण्यात आला. यावेळी वाजगाव येथील स्मशानभूमीसाठी पाण्याची टाकीही भेट देण्यात आली. यावेळी आमदार डॉ. राहूल अहेर, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर आदी उपस्थित होते.
गैरसोय दूर होईल
स्मशानभूमी दूर अंतरावर असेल तर घरापासून तिरडीवर प्रेत नेतांना नागरीकांची गैरसोय होत होती. अनेक वेळा पायी चालत जाणे शक्य नसल्यामुळे प्रेत ट्रॅक्टरसारख्या एखाद्या वाहनातून स्मशानभूमीपर्यंत न्यावे लागत होते. त्यामुळेच वडिलांची स्मृती कायम राहील, तसेच पंचक्रशीतील नागरीकांची गैरसोय दूर होईल, या हेतूने वैकुंठरथ देण्यात आला आहे.
- केवळ कडू देवरे

Web Title: Vaikuntharath in remembrance of the Father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक