शिष्यवृत्ती परीक्षेत वैनतेयची प्रियाणी सोनवणे जिल्ह्यात नववी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 11:00 PM2022-01-10T23:00:41+5:302022-01-10T23:01:07+5:30
निफाड : इयत्ता आठवीसाठी असलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियाणी सोनवणे ही जिल्ह्यात नववी आली.
निफाड : इयत्ता आठवीसाठी असलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियाणी सोनवणे ही जिल्ह्यात नववी आली.
या परीक्षेत १६ विद्यार्थी पात्र ठरले होते, यातील बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत, तर प्रियाणी सोनवणे ही ७७.३३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात नववी आली. कृष्णा कापसे, संचिता सूर्यवंशी, लावण्या शिंदे, यज्ञेश सांगळे, आदिती बागडे, देवेश गुजराथी, आदित्य केदार, सात्त्विक सानप, आर्यन बागडे, अनुज कडलग, श्रावणी जाधव हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यूपीएससी परीक्षेत देशात ११८वा आलेल्या दर्शन सूर्यवंशीचा सत्कार त्याचे वडील प्रा. राजेंद्र सूर्यवंशी यांनी स्वीकारला.
या विद्यार्थ्यांना पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती विभागप्रमुख एस. एन. पटेल, एस. एस. कापसे, जालिंदर कडाळे, एस. एस. सूर्यवंशी, कल्पेश खैरनार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, पर्यवेक्षक एन. डी. शिरसाट, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. एन. एस. साबळे आदी मान्यवर होते.