वैशाली भोसले विजयी : सेनेच्या चव्हाण, भाजपाच्या लोणारी पराभूत पोटनिवडणुकीत मनसेची बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:14 AM2018-04-08T01:14:38+5:302018-04-08T01:14:38+5:30

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(क) या महिलांसाठी राखीव रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि.६) झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली.

Vaishali Bhosale wins: Mena's defeat in the by-election of Shiv Sena, BJP's Lonar Bye | वैशाली भोसले विजयी : सेनेच्या चव्हाण, भाजपाच्या लोणारी पराभूत पोटनिवडणुकीत मनसेची बाजी!

वैशाली भोसले विजयी : सेनेच्या चव्हाण, भाजपाच्या लोणारी पराभूत पोटनिवडणुकीत मनसेची बाजी!

Next
ठळक मुद्देइंजिनने दुसºया फेरीपासून धरलेला सुसाट वेग पाचव्या फेरीपर्यंत कायम शुक्रवारी झालेल्या मतदानात मतदारांचा फारसा उत्साह नव्हताच

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(क) या महिलांसाठी राखीव रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि.६) झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली असून, या पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांनी दोन हजारांहून अधिक मतांनी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा पराभव केला. शनिवारी झालेल्या मतमोजणीत अ‍ॅड. भोसले यांना ७ हजार ४५३ मते मिळाली, तर सेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण यांना ५ हजार १३१ मते मिळाली. म्हणजेच एकूण २ हजार ३२२ मताधिक्क्यांनी अ‍ॅड. भोसले विजयी झाल्या. भाजपाच्या उमेदवार विजया लोणारी तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना ४ हजार ८१० मते मिळाली. भोसले यांच्या विजयाने मनसेने पुन्हा या प्रभागाचा गड राखण्यात यश मिळविले. मनसेच्या इंजिनने दुसºया फेरीपासून धरलेला सुसाट वेग पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने सेना-भाजपाचा धुव्वा उडाला. प्रभाग १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी झालेल्या मतदानात मतदारांचा फारसा उत्साह नव्हताच. या निवडणुकीसाठी अवघे ३९.७१ टक्के मतदान होऊ शकले. त्यामुळे बदलाला अनुकूल मतदान नसल्याचे संकेत बांधले जात होते. प्रत्यक्षात तसेच स्पष्ट करणारा निकाल लागला आहे. शनिवारी (दि.७) गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या फेरीत चव्हाण यांना ६९५, तर भोसले यांना ३७३ मते होती. मात्र दुसºया फेरीत भोसले यांनी आघाडी घेत ६७७, तर चव्हाण यांना ३४० मते मिळाली. सहाव्या फेरीत भोसले यांना एक हजार १६१, तर चव्हाण यांना ३४५ मते मिळाली. या फेरीपासून भोसले यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
विजयानंतर भोसले भावुक
मतमोजणीची अकरावी फेरी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निकाल जाहीर करत अ‍ॅड. वैशाली भोसले यांना सर्वाधिक ७४५३ मते मिळाल्याचे सांगत विजयी घोषित केले. यावेळी निकाल ऐकून भोसले आपल्या सासू दिवंगत सुरेखाताई भोसले यांच्या आठवणींनी भावुक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे काका माजी आमदार नितीन भोसले यांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांना रडताना बघताना उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल होऊन काही काळ उत्साह मावळला. रविवार कारंजा परिसरातील मितभाषी व सदैव जनतेच्या कामासाठी धावून जाणाºया लोकप्रतिनिधी म्हणून दिवंगत सुरेखाताई परिचित होत्या.

Web Title: Vaishali Bhosale wins: Mena's defeat in the by-election of Shiv Sena, BJP's Lonar Bye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.