वाजपेयींच्या अस्थींचे गिरणापात्रात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:29 AM2018-08-25T00:29:29+5:302018-08-25T00:30:00+5:30
माजी पंतप्रधान व भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश येथील सटाणा नाका भागातील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच कीर्तन व सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश घेऊन जात शहरालगतच्या गिरणा पुलाजवळील नदीपात्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
मालेगाव : माजी पंतप्रधान व भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश येथील सटाणा नाका भागातील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच कीर्तन व सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश घेऊन जात शहरालगतच्या गिरणा पुलाजवळील नदीपात्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
भारतातील शंभर नद्यांमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येत आहे. मुंबईहून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी अस्थिकलश धुळे येथे आणला होता. शुक्रवारी मालेगाव येथील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात दिवसभर अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अकरा ते तीन या वेळेत शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. ३ ते ४ या वेळेत ह.भ.प. नरेंद्र गुरव महाराज यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाºयांनी शब्दसुमनांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, मविप्रचे अध्यक्ष तथा कॉँग्रेसचे नेते डॉ. तुषार शेवाळे, कॉँग्रेसचे नेते प्रसाद हिरे, शांताराम लाठर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगरप्रमुख सुनील गायकवाड, दीपक पवार, संदीप पाटील, हरिप्रसाद गुप्ता, नितीन पोफळे, मदन गायकवाड, राजेंद्र भोसले, प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, रामा मिस्तरी, शिवसेनेचे नगरसेवक नीलेश आहेर, मनोहर बच्छाव, अनिल पिंगळे, प्रदीप बच्छाव, जगदीश गोºहे, अर्शद मिनानगरी, मंजूषा कजवाडकर, जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दिंडोरीत सर्वपक्षीय शोकसभा
दिंडोरी : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिंडोरी येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, श्रीराम शेटे, संदीप जगताप, चंद्रकांत राजे, नितीन गांगुर्डे, डॉ. देशपांडे, नरेंद्र जाधव, विलास देशमुख, रणजित देशमुख, मंदा पारख, सागर पगारे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी अनिल देशमुख, सुनील केदार, तुषार घोरपडे, संजय कावळे, योगेश बर्डे, प्रमोद देशमुख, बाबा पिंगळ, श्याम मुरकुटे, उत्तमराव जाधव, मनोज ढिकले, चंद्रकांत राज आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.