वाजपेयींच्या निधनाने शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:00 AM2018-08-17T01:00:41+5:302018-08-17T01:01:16+5:30
नाशिक : देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याने चिंताक्रांत असलेले या पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक सायंकाळी शोकसागरात बुडाले. वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांना अश्रुअनावर झाले. यामुळे शासनाने दुखावटा जाहीर केल्याने शहरातील सायंकाळपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या दुपारपासून चिंतेचे सावट भाजपा कार्यकर्त्यांवर दिसू लागले होते. वाजपेयी यांची प्रकृती सुधारावी यासाठी कार्यकर्ते प्रार्थना करीत होते. त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी पंचवटी मंडल कार्यकर्ते तसेच पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकर्त्यांनी रामकुंडावरील बाणेश्वराला लघुरुद्राभिषेकदेखील केला. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी तसेच अन्य अनेक कार्यकर्ते वसंतस्मृती येथे केवळ दूरचित्रवाहिन्यांवर नजर ठेवून होते. दुपारनंतर चिंतेचे ढग दाटू लागले आणि सायंकाळी दु:खद वार्ता आली आणि सारेच शोकसागरात बुडाले.
महापालिकेत राजीव गांधी भवन येथे गणेश मंडळाची सुरू असलेली बैठक अर्धवटच संपवण्यात आली. तर कालिदास कलामंदिराच्या लोकार्पणामुळे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले केंद्र सरकारने राष्टÑीय दुखवटा जाहीर केल्याने शुक्रवारीही बहुतांशी बैठका आणि विशेष करून सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.