‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन गुलाबासह आइस्क्रीम अन् गिफ्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:13 AM2018-02-15T01:13:14+5:302018-02-15T01:16:08+5:30
नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न झाला.
नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न झाला.
महाशिवरात्रीनंतर बुधवारचा दिवस खास होता. मात्र सकाळपासूनच हवेत निर्माण झालेला गारवा, थंडी, सूर्यदर्शन न झाल्याने अंधारलेले वातावरण यामुळे काहीशी शांतता पहायला मिळत होती. मात्र सकाळी १० नंतर कॉलेजरोड, गंगापूररोडचा परिसर तरुणाईने फुलला होता. यावर्षी व्हॅलेंटाइन डे रविवारी न आल्याने युवक-युवतींनी महाविद्यालयांमध्ये नियमित हजेरी लावली. एरवी कॉलेजच्या नावावर इतरत्रच भटकंती करणाºया तरुणाईने व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर महाविद्यालय परिसरात आवर्जून हजेरी लावली होती.
जवळपासच्या पर्यटनस्थळांवर सेल्फीचा आनंद घेत, प्रियजनांना निरनिराळ्या आकर्षक भेटी देत व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. काहींनी सिनेमा, हॉटेलिंग, काहींनी शॉपिंग तर काहींनी जिवलगांशी भरभरून गप्पा मारत हा दिवस साजरा केला. गुलाबाची फुले आणि गुलाबी फुगेतरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आणि मित्र-मैत्रिणींकडे ‘रेड रोझ’ देत प्रस्ताव मांडला. गुलाबाच्या फुलांबरोबर लाल, गुलाबी रंगांतील फुग्यांचेही अदानप्रदान करण्यात आले. प्रेम संदेशाचे प्रतीक असलेले फुगे आणि फुलांना चांगलाच रंग चढला होता.रेड रोझ वीस रुपयेव्हॅलेंटाइन डे निमित्त गुलाबाच्या फुलाला वाढती मागणी होती. मात्र बाजारात गुलाबाच्या फुलांची प्रचंड आवक झाल्याने भाव कोसळले होते. मात्र कॉलेजरोड परिसरात गुलाबाच्या एका फुलाची किंमत प्रत्येकी वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत होती. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळे प्रियकर-प्रेयसींनी गुलाबाच्या फुलाचे दर कमी असो वा जास्त असो, याची कोणतीही काळजी न करता एकमेकांना गुलाबाचे फूल देत आपल्या भावना व्यक्त केल्या.