मौल्यवान मालमत्ता अन् कवडीमोल कुलूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:51+5:302021-01-03T04:15:51+5:30
नाशिक : नाशिक शहर व परिसरात दिवसेंदिवस रात्री तसेच भरदिवसाही दुकानांसह घरे फोडून लाखोंचा ऐवज लुटण्याच्या घटना सातत्याने घडत ...
नाशिक : नाशिक शहर व परिसरात दिवसेंदिवस रात्री तसेच भरदिवसाही दुकानांसह घरे फोडून लाखोंचा ऐवज लुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. एकीकडे या घरफोड्या वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांची उदासिनताही बहुतांश घटनांमधून दिसून येते. बहुसंख्य नागरिक आपल्या घरातील मौल्यवान वस्तू असलेल्या कपाटांना तसेच तिजोरी व दुकानांच्या शटरला अगदी सहजरीत्या खोलता येईल असे कुलूप लावतात, यामुळे चोरट्यांचे फावत आहे.
शहरात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरटे बंद घराचे कडी-कोयंडा व कुलुपे तोडून रोकड, दागिने चोरी करून पोबारा करतात. गुन्हेगारीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी जशी खबरदारी बाळगली पाहिजे, तशी नागरिकांनीसुध्दा बाळगणे गरजेचे आहे. सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून दाखविला जाणारा निष्काळजीपणादेखील अनेकदा घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांना निमंत्रण देणारा ठरतो. अनेकदा बाल्कनीचा दरवाजा म्हणून त्याच्या सुरक्षिततेकडे केले जाणारे दुर्लक्ष, घरामधील लोखंडी कपाटाला असलेले हलके दर्जाचे कुलूप यासह खिडकींभोवती लोखंडी रेलिंगचा असलेला अभाव अशा अनेकविध कारणांमुळे घरफोड्या करणाऱ्यांना वाव मिळतो. काळानुरूप बाजारात आधुनिक पध्दतीचे दर्जेदार अशी कुलुपे उपलब्ध झाली आहेत, मात्र कुलुपांवर इतका खर्च करायचा तरी कशाला? या मानसिकतेपोटी बहुतांश नागरिक कमी दणकट व कमी किमतीत कुलुपे खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ‘रेग्युलर’ वापराच्या नावाखाली हलके कुलूप घेण्याचे प्रमाण अलीकडे वाढू लागले आहे. शहर पोलिसांकडून याबाबत वारंवार आवाहनही केले जाते की, आपल्या घरांची काळजी व मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते खबरदारीचे उपाय करावेत, मात्र याबाबत नागरिकांमध्ये उदासिनता कमालीची दिसून येते.
---इन्फो--
२३५ घरफोड्यांत लाखोंचा ऐवज चाेरी
नाशिक शहरात २०२० सालात सुमारे २३५ घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १९१ घरफोड्या या रात्रीच्या वेळीस झाल्या आहेत. यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे घरफोड्यांचे प्रमाण काहीसे कमी होण्यास मदत झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी भरदिवसा घरफोड्या करण्याच्या घटनांमध्ये दहाने वाढ झाली तर रात्रीच्या घटनांमध्ये २५ने घट झाली आहे.
---इन्फो--
या कुलुपांना जास्त मागणी (टक्क्यांत)
नॉब लॉक्स-४२%
कॅप लॉक्स- २०%
डेडबोल्ट लॉक्स- ३०%
मॅड लॉक्स- १५%
मोर्डीज लॉक्स- २०%
----
पॉइंटर्स- मोर्डीज लॉक-२६०० (सर्वात महाग कुलूप)
राउंड पॅड लॉक - ८०० (सर्वात स्वस्त कुलूप)
---
डमी फॉरमेट आर वर ०२ हाऊस लॉक नावाने सेव्ह.
फोटो- आर वर ०२पॅड लॉक आणि ०२ राऊंड पॅड लॉक तसेच स्केच ०२डेस हॅलो नावाने सेव्ह आहे.