मूल्यवर्धित शिक्षणाची गरज

By Admin | Published: January 5, 2017 02:26 AM2017-01-05T02:26:52+5:302017-01-05T02:27:07+5:30

शांतीलाल मुथा : घोटीत राज्यस्तरीय शाळा आढावा बैठक

Value-added education needs | मूल्यवर्धित शिक्षणाची गरज

मूल्यवर्धित शिक्षणाची गरज

googlenewsNext

घोटी : परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी मूल्यांची शिकवण बालपणापासूनच देणे गरजेचे असून, गुणवत्ता विकासाबरोबरच मूल्यांचा विकास होणेही महत्त्वाचे आहे. सक्षम नागरिक घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी केले.
राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्राथमिक शिक्षण संचालनालय व मुथा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घोटी येथे मूल्यवर्धन समग्र शाळा दृष्टिकोन उपक्रमाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुथा बोलत होते.
यावेळी राज्य प्रतिनिधी वल्लभ भन्साळी, रत्ना भन्साळी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकुमार साखला, जिल्हा परिषद सदस्य अलका जाधव, माजी संघपती किसनलाल पिचा, महेश पिचा, धर्मा आव्हाड, लखीचंद श्रीश्रीमाळ, पुरणचंद लुणावत, गटशिक्षण अधिकारी शिवाजी अहिरे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ, जिल्हा समनव्यक नथू मुसळे, केंद्रप्रमुख अकबर शेख, स्मिता गोसावी, मधुकर कडू, राकेश वाकचौरे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शांतीलाल मुथा यांनी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांची वर्गनिहाय भेटी देत माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना मूल्याची शिकवण, न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता व भारतीय संविधानाने लोकशाही तत्त्वाची कदर आणि आचरण कशाप्रकारे केले जाते व मूल्यवर्धित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये घडून आलेले परिवर्तन याबाबतची प्रात्यक्षिके व शिक्षकांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.(वार्ताहर)

Web Title: Value-added education needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.