दापूर, नळवाडी, चापडगाव येथे वनमहोत्सव

By admin | Published: July 8, 2017 11:03 PM2017-07-08T23:03:13+5:302017-07-08T23:03:36+5:30

नांदूरशिंगोटे : ग्रामपंचायत व वनविभागाच्या वतीने वृक्षलागवड करून वनमहोत्सव साजरा करण्यात आला.

Vanamahotsav at Dapour, Nalwadi, Chapadgaon | दापूर, नळवाडी, चापडगाव येथे वनमहोत्सव

दापूर, नळवाडी, चापडगाव येथे वनमहोत्सव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर, नळवाडी व चापडगाव परिसरातील ग्रामपंचायत व वनविभागाच्या वतीने वृक्षलागवड करून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
दापूर येथील ग्रामपंचायत परिसरात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एन. बोडके, सरपंच मुक्ता मोरे, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, कचूनाना आव्हाड, मुख्याध्यापक पी. व्ही. पावरा, श्रीराम आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे, वनसंरक्षक ए. एल. फटांगरे उपस्थित होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात पंचायत समिती सदस्य भाबड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या आवारात वृक्षलागवड करण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’बाबत सर्वांनी आपापल्या घरापुढे एकतरी रोप लावून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. शासनाने राबविलेल्या उपक्रमात ग्रामपंचायतीने भाग घेऊन चांगला उपक्रम केला असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य भाबड यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच श्रीराम काकड, वासुदेव आव्हाड, पोपट आव्हाड, शंकर मोरे, योगेश आव्हाड, अशोक आव्हाड, संगीता बोडके, सविता आव्हाड, निशा आव्हाड, रंजना केदार, भीमाबाई आव्हाड, भाऊसाहेब मोरे, अर्चना आव्हाड, ग्रामसेवक प्रदीप काशिद, वनपाल प्रीतेश सरोदे, अजय कडाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Vanamahotsav at Dapour, Nalwadi, Chapadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.