वनमहोत्सव : ‘हरित नाशिक’साठी एकत्र आले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:41 PM2018-07-01T16:41:06+5:302018-07-01T17:18:08+5:30

निमित्त होते, वनमंत्रालयाकडून मागील दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या वनमहोत्सवाचे. यावर्षी तिस-या टप्प्यात १३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट वन मंत्रालयाने ठेवले आहे. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लागवड करीत वनमहोत्सव साजरा केला.

 Vanamohotsav 2018: Hundreds of hands were gathered for 'green Nashik' | वनमहोत्सव : ‘हरित नाशिक’साठी एकत्र आले शेकडो हात

वनमहोत्सव : ‘हरित नाशिक’साठी एकत्र आले शेकडो हात

Next
ठळक मुद्दे वनविभागाच्या जिल्ह्यातील ७० रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीएकूण १२३.२५ लाख रोपांची उपलब्धता करून देण्यात आली खोदलेल्या ४९ हजार ५०० खड्ड्यांमध्ये रोपांची लागवड या महिन्यात पूर्ण केली जाणार

नाशिक : तपमानवाढीचे गडद होणारे संकट, हवामान व ऋ तू बदलाची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी वृक्षलागवड-संवर्धनाचा एकमेव पर्याय असल्याचे जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे. राज्यात वनांचे आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाचे महत्त्व ओळखून ‘वनमहोत्सव’ हा वन मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१) शहराला हिरवाईचे कोंदण प्राप्त करून देण्यासाठी शेकडो नाशिककरांचे हात एकत्र आले.

निमित्त होते, मंत्रालयाकडून मागील दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या वनमहोत्सवाचे. यावर्षी तिस-या टप्प्यात १३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट वन मंत्रालयाने ठेवले आहे. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लागवड करीत वनमहोत्सव साजरा केला. वनविभागाने ४७ लाख ६० हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती मिळून १५ लाख आणि अन्य शासकीय संस्थांनी साडेनऊ लाख रोपांची लागवड करावयाची आहे. जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार रोपांच्या लागवडीचे ध्येय आहे. वनविभागाकडून एक हजार रोपांची लागवड करून शुभारंभ मौजे धोंडेगाव-देवरगाव शिवारात करण्यात आला. त्रिपक्षीय करारानुसार पश्चिम वनविभागांतर्गत सॅमसोनाईट व तैनवाला फाउंडेशनच्या वतीने धोंडेगाव-देवरगाव शिवारातील डोंगरांवर ४९ हजार ५०० रोपांची लागवड करण्याचे निश्चित झाले आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने वनविभागाने एक हजार रोपे पहिल्या टप्प्यात लावून शुभारंभ केला. याप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव, वनसंरक्षक (वन्यजीव), एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक डॉ. शिवाबाला एस. आदी उपस्थित होते. खोदलेल्या ४९ हजार ५०० खड्ड्यांमध्ये रोपांची लागवड या महिन्यात पूर्ण केली जाणार असल्याचे वनमहोत्सवाच्या नाशिक जिल्हा समन्वयक उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांनी सांगितले.



‘या’ प्रजातींची लागवड
वनमहोत्सवासाठी जिल्ह्याला रोपांचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने वनविभागाच्या जिल्ह्यातील ७० रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मिती करण्यात आली. एकूण १२३.२५ लाख रोपांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कडुलिंब, शिरस, बाभूळ, शिसम, खैर, शिसू, करंज, साग, अंजन, वावळा, आपटा, खाया, आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, आवळा, बेहडा, हिरडा, रिठा, अर्जुनसादडा, कवठ, ब्रह्मानंद या प्रजातींचा समावेश आहे. वनमहोत्सवांतर्गत या भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

Web Title:  Vanamohotsav 2018: Hundreds of hands were gathered for 'green Nashik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.