विंचूरला द्राक्षबागांसह शेतपिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:30 PM2019-11-04T12:30:07+5:302019-11-04T12:30:16+5:30
विंचूर : परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांसह डाळींब, मका, बाजरी आदि शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विंचूर : परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांसह डाळींब, मका, बाजरी आदि शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या द्राक्षबागेचे झालेले नुकसान पाहून शेतकर्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले असून, येथे आतापर्यंत साडेतीनशे हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पुर्ण झाल्याची माहिती महसुल विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, पंचनाम्याची प्रक्रिया सुरु असली तरी नुकसानभरपाई त्वरीत मिळण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे डाऊनी, करपा आण िमूळकूज आदी रोगांनी द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. विंचूर व परिसरातील जवळपास ७० ते ८० टक्के बागा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. विंचूर व परिसरात दुपारनंतर व रात्री पडत असणार्?या परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. ५० टक्के द्राक्ष बागा या फुलोरा अवस्था ते मणी सेटिंग यादरम्यान असल्याने हा पाऊस द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठला आहे. अतिपावसामुळे झाडाच्या खाली मुळी चालेना म्हणुन अक्षरशा बागाच्या फांद्यांना मुळ्या फुटल्या आहेत. पावसाच्या उघडीप नंतर द्राक्षबागांवर औषध फवारणी करण्याची धांदल सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाऊस एवढा पडला नाही परंतु परतीचा पाऊस मात्र मोठ्या प्रमाणात पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.