वैनतेय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:06 PM2019-04-09T19:06:53+5:302019-04-09T19:07:17+5:30
निफाड : लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी निफाड येथील वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी गोलाकार मानवी साखळी करून अनोख्या पद्धतींने मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्र म यशस्वी करण्यात आला. ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या प्राचार्य मालती वाघवकर यांनी नियोजन केले.
जेव्हा या विद्यार्थ्यांनी गोलाकार वर्तुळ करून मानवी साखळी तयार केली होती. तेव्हा विद्यार्थ्यांनी बाहेरील बाजूने पांढरे वर्तुळ केले होते. व मध्यभागी विद्यार्थिनींनी तिरंगा झेंड्याचा आकार दिला होता. तेव्हा या मानवी साखळीच्या मध्यभागी व्होट फॉर बेटर इंडिया असे घोषवाक्य रांगोळी काढून तयार करण्यात आले होते. याप्रसंगी उपप्राचार्य रेखा चौधरी, पर्यवेक्षक डी. बी. वाघ, बी. वाय. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदींसह शिक्षक उपस्थित होते.
(फोटो ०९ निफाड)