नगरसेवक संगमनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:15+5:302021-06-06T04:12:15+5:30
शुक्रवारी दुपारी २ वाजता सुनील डोंगरे हे संपर्क कार्यालय बंद करून गेले. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित ऋषिकेश ...
शुक्रवारी दुपारी २ वाजता सुनील डोंगरे हे संपर्क कार्यालय बंद करून गेले. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित ऋषिकेश ऊर्फ तात्या चौधरी, सचिन डांगे, अमोल बोराडे, आदित्य बोराडे, निखिल बोराडे व त्यांचे पाच सहा साथीदार दुचाकीवर संपर्क कार्यालय येथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘बाहेर भेटला तर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही’ अशा धमक्या देत आरडाओरड करत हातातील लाठ्याकाठ्यांनी व दगड फेकून मारून संगमनेरे यांच्या कार्यालयावरील नामफलकाची तोडफोड केली. अचानक नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. सदर घटनेची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र कार्यालय नामफलकाची तोडफोड करून हल्लेखोर लागलीच दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.