विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:35 AM2018-11-21T01:35:26+5:302018-11-21T01:35:50+5:30

जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

Vandalism of Gramsevaks from the Fuel Boundary | विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी

विंधनविहिरीवरून ग्रामसेवकांची कानउघडणी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : पाणीटंचाई असतानाही प्रपत्र दिल्याने संताप

नाशिक : जिल्ह्यात पाणी आणि दुष्काळाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असताना विंधन विहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधन विहिरीस पाणी लागले, तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.
नांदगाव पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात नांदगाव तालुक्यातील १६ योजना प्रस्तावित असून, यापैकी पाच योजनांचे सर्वेक्षण बाकी आहे. सदरचे सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. नांदगाव तालुक्यात सुरू असलेले टँकर नादुरु स्त असल्याची तक्र ार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी यावेळी केली. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ टँकर बदलून देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. गावात टँकर सुरू असतानाही
विंधन विहिरीसाठी ग्रामसेवकांनी अद्यापही विहित नमुन्यात माहिती दिलेली नसल्याने डा.ॅ गिते यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सदर गावात विंधन विहिरींना पाणी लागल्यास टँकरसाठी होणारा खर्च वसूल करण्याचा इशारा दिला. यावेळी नळ योजना दुरु स्ती, तात्पुरत्या नळ पाणीयोजना, विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहित करणे याबाबतही आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी पाणीटंचाईबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून पाणीटंचाईबाबत जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. पाणीटंचाईचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत तत्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस पंचायत समिती सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुठे, मधुबाला खिराडकर, तहसीलदार भारती सागरे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
पाणीपट्टी वसुली न झाल्याने योजना बंद
नांदगाव ४२ गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी वसुलीबाबत आढावा घेतला असता वसुली होत नसल्याचे आढळून आले. पाणीपट्टी वसुली झाली नाही व वीज बिलामुळे योजना बंद झाली तर याची जबाबदारी ग्रामसेवक व गटविकास अधिकाºयांची राहील, असेही डॉ. गिते यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Vandalism of Gramsevaks from the Fuel Boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.