दरी ग्रामस्थांकडून दारूबंदीसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:14 AM2018-08-07T01:14:14+5:302018-08-07T01:14:30+5:30
दरी गावातील काही समाजकंटकांकडून सर्रास देशी दारूचे दुकान रस्त्यावर मांडून विक्र ी केली जात असल्याने गावातील अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत तर शेजारील गावात दारूबंदी असल्याने तेथील दारू पिणारे रस्त्यावर गर्दी करतात व त्यामुळे या मद्यपींचा त्रास ग्रामस्थांना होत आहे.
मातोरी : दरी गावातील काही समाजकंटकांकडून सर्रास देशी दारूचे दुकान रस्त्यावर मांडून विक्र ी केली जात असल्याने गावातील अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत तर शेजारील गावात दारूबंदी असल्याने तेथील दारू पिणारे रस्त्यावर गर्दी करतात व त्यामुळे या मद्यपींचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. गावात यामुळे नेहमी वाद होताना दिसतात. दारूबंदीसाठी याआधीदेखील अनेकदा अर्ज देऊन तात्पुरत्या स्वरूपात दोन-तीन दिवस पोलीस खात्याकडून कारवाई केली गेली. परंतु परत जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने पोलीस खात्यातील काही मंडळीच्या वरदहस्ताने सदर दारू दुकानचालकांना पाठिंबा मिळत असल्याची गावात चर्चा होत आहे.
गावातील पोलीस पाटील राजेंद्र पिंगळे यांनीही कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गावातील सरपंच शोभा रमेश मालेकर, अलका गांगोडे, दीपक ढेरिंगे, शिवाजी गोडे, मोतीराम आचारी, सतीश बेंडकोळी, रमेश गोडे, ज्ञानेश्वर दिवे, रोशन दिवे, जीवन दोंदे, विजय खराटे, निशांत शिंगाडे, केशव नामाडे, सुनील लहांगे, करण झणकर आदींनी कारवाईची मागणी केली आहे.
मोर्चा काढण्याचा इशारा
अखेर गावातील महिला व पुरु ष मंडळी एकत्रित जमा होऊन सामाजिक कार्यकर्ते विलास साडखोरे यांच्या सहकार्याने तालुका पोलीस निरीक्षक बी. बी. ठोबे यांना निवेदन देत बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. दारूबंदी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे विलास साडखोरे यांनी सांगितल्याचे यावेळी गावातील महिलांनी सांगितले.