नांदूरवैद्य, लासलगावी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:49 PM2019-10-21T12:49:23+5:302019-10-21T12:49:57+5:30
Maharashtra assembly election 2019 नांदूरवैद्य : येथील मतदान केंद्रावर अचानक ईव्हिएम मशिन बंद पडल्याने निवडणूक यंञनेची धावपळ उडाली तर मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे चिञ पहावयास मिळाल्याने मतदारांमध्ये मनस्ताप झाला.
नांदूरवैद्य : येथील मतदान केंद्रावर अचानक ईव्हिएम मशिन बंद पडल्याने निवडणूक यंञनेची धावपळ उडाली तर मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे चिञ पहावयास मिळाल्याने मतदारांमध्ये मनस्ताप झाला. दरम्यान, लासलगाव जवळील ब्राम्हणगाव विंचुर येथील मतदान केंद्रावर सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास दोन मतदान मशीनच्या व्हीव्हीपॉड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे वीस मिनोटे मतदान प्रक्रि येत अडथळा निर्माण झाला होता. मतदान अधिकारी आर.डी.जाधव यांनी राखीव मशीन जोडले व सकाळी सव्वाआठ वाजता त्यानंतर मतदान पुर्ववत सुरू झाले . इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सकाळी सात वाजता विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येला सुरु वात झाल्यानंतर बुध क्र मांक १५६ वर २१ मतदान झाल्यावर ईव्हीएम मशिन बंद पडली.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी सुरु झालेल्या मतदानाच्या प्रक्रि येवर ईव्हीएम मशिन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांनागरिकांचा उत्साह ओसरल्याचे दृश्य नांदूरवैद्य येथे दिसून आले.मतदारांनी बाहेर रांगा लावल्या असून त्यांना दुसर्या मशिनच्या प्रतिक्षेत तिष्ठत राहावे लागले.यामध्ये प्रामुख्याने अपंग, वृद्ध, तसेच कामगार यांचा सामावेश असल्यामुळे काही मतदार मतदान न करताच माघारी गेले.यानंतर तासाभरात निवडणूक अधिकारी यांना सदर मशिन बंद पडल्याचे माहिती देताच तासाभरात त्याजागी दुसरी ईव्हीएम मशिन लावण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रि येला पुन्हा सुरूवात झाली.