जळगावच्या उपसरपंचपदी वनीता वडघुले बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 03:33 PM2019-03-11T15:33:18+5:302019-03-11T15:34:01+5:30

निफाड : तालुक्यातील जळगांवच्या उपसरपंचपदी वनीता गणेश वडघुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Vanitha Vadghule, the vice-president of Jalgaon, is unconstitutional | जळगावच्या उपसरपंचपदी वनीता वडघुले बिनविरोध

जळगावच्या उपसरपंचपदी वनीता वडघुले बिनविरोध

Next

निफाड : तालुक्यातील जळगांवच्या उपसरपंचपदी वनीता गणेश वडघुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडघुले यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय सोमवंशी यांनी काम पाहिले. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीसाठी सुधीर कराड , सरपंच विष्णू कुंदे, कांताबाई वडघुले , विद्या वडघुले, सुमन गायकवाड ,अनुसया थीगळे ,शोभा निरभवणे , वैभव जळगावकर आदी ग्रा. प. सदस्य उपस्थित होते उपसरपंचपदासाठी विनता वडघुले यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते वडघुले यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी सोमवंशी यांनी विनता वडघुले यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले .

Web Title: Vanitha Vadghule, the vice-president of Jalgaon, is unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक