वंजारवाडी झाले आता पोस्टाचे डिजिटल ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:48 AM2019-08-08T00:48:25+5:302019-08-08T00:59:51+5:30

मनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.

Vanjarwadi has now become the digital village of Posta | वंजारवाडी झाले आता पोस्टाचे डिजिटल ग्राम

वंजारवाडी, ता. नादंगाव येथे डिजिटल ग्राम कार्यक्रमप्रसंगी डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी, परमेश्वर क्षीरसागर, नीलेश कपिले, शंकर गुंडगळ, भाऊसाहेब चव्हाण, रंगनाथ धिवर, सोनाली जाधव, प्रवीण देशमुख आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देकॅशलेस व्यवहार : मनमाडला जायची पायपीट थांबली, ग्राहकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.
वंजारवाडी गावात एकही पतसंस्था व बॅँक नसल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील ग्रामस्थांना मनमाड येथे जावे लागत होते. या गावाने टपाल बॅँकिंगचा पर्याय स्वीकारला असून, यामुळे आता गावातच आर्थिक व्यवहार होत आहे. गावातील पोस्टमास्तर सोनाली जाधव यांच्या प्रयत्नांतून हे गाव पोस्ट बॅँकिंगच्या बाबतीत डिजिटल झाल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार
व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी, तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, डाक निरीक्षक राजेंद्र वानखेडे, पोस्टमास्तर नीलेश कपिले, सरपंच शंकर गुंडगळ, भाऊसाहेब चव्हाण, पोलीसपाटील रंगनाथ धिवर, एस. एस. नागरे, एस.डब्ल्यू. अहिरे, सोनाली जाधव, ए.पी. अहिरे, प्रवीण देशमुख, सुमित गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Vanjarwadi has now become the digital village of Posta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.