नाशिकमध्ये ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा, पाणी पातळीत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 08:45 AM2017-11-15T08:45:03+5:302017-11-15T08:46:27+5:30

नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील धार्डे दिगर शिवारापासून सुरु वात करण्यात आली.

Vanrai Bandhara built by the villagers, In Nashik | नाशिकमध्ये ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा, पाणी पातळीत होणार वाढ

नाशिकमध्ये ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा, पाणी पातळीत होणार वाढ

googlenewsNext

मनोज देवरे/कळवण (नाशिक) - नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील धार्डे दिगर शिवारापासून सुरु वात करण्यात आली. तालुक्यातील वनराई बंधारे उपक्रमाला धार्डे दिगर ग्रामपंचायतमधील बरड पाडा ताकबारी धरणातील नाल्यावर ४० फूट रुंद मातीनाला वनराई बंधारा बांधण्यात आला.

नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव परिसरात किमान 5 वनराई बंधा-याची बांधणी श्रमदानातून करायची आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गट, स्वयंसेवी संस्था अशा विविध सामाजिक घटकांचा व लोकसहभाग महत्त्वाचा समावेश करून गाव परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल, यासाठी प्रयत्न करावयाचे असल्याचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी सांगितले आहे.

कळवण तालुक्यातील वनराई बंधारे उपक्र माला धार्डे दिगर बरडपाडा येथे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, नितीन पवार, उपसभापती विजय शिरसाठ, गटविकास अधिकारी बिहरम यांच्या समवेत सरपंच ललिता जाधव, कनिष्ठ अभियंता के.आर.चव्हाण, उपसरपंच काशिनाथ बिहरम , ग्रामसेवक एस.वाय.महाले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते . लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व अधिकारी अथक प्रयत्नातून सुमारे ४० फूट रुंद मातीनाला वनराई बंधारा बांधण्यात आला.
 
कळवण तालुक्यातील सर्व गावात दरवर्षी लोकसहभागातून जलसंधारणासारख्या कामाला हातभार लावत आहे, हे उल्लेखनीय आहे . धार्डे दिगर परिसरातील ग्रामस्थांनी वनराई बंधारे बांधण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. - जयश्री पवार , जि.प. सदस्य , धार्डे दिगर गट
 
कळवण तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाचवनराई बंधारे बांधण्यासाठी सुचित केले आहे. दरवर्षी सर्व विभागाकडून अनेक वनराई बंधारे बांधले जातात. या बंधा-यांमुळे अनेक हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा फायदा शेतक-यांना व प्राण्यांना होणार आहे. - डी.एम.बहिरम , गटविकास अधिकारी
 
 

Web Title: Vanrai Bandhara built by the villagers, In Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.