पेठ पंचायत समितीने बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:17 AM2017-10-07T01:17:42+5:302017-10-07T01:17:58+5:30
पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक यांनी पेठनजीक संगमेश्वर मंदिराजवळ वनराई बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश दिला.
पेठ : पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक यांनी पेठनजीक संगमेश्वर मंदिराजवळ वनराई बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश दिला.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पेठ तालुक्याला जवळपास ४५० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले असून, यामध्ये पंचायत समितीअंतर्गत येणाºया सर्व विभागांना संख्येनुसार विभागणी करून देण्यात आली. गढईपाडा या गावाला पाणीपुरवठा करणाºया संगमेश्वर मंदिरानजीक कूपनलिकेच्या उगमस्थानावर गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, गटशिक्षणाधिकारी कैलास माळवाळ यांच्या उपस्थितीत वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे वाहते पाणी अडकून कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. याप्रसंगी गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, गटशिक्षणाधिकारी कैलास माळवाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी ए.बी. भुसावरे, बालविकास प्रकल्पाधिकारी कव्हाळे, विस्तार अधिकारी बी.एस. पवार, आर.डी. शिंदे, ग्रामसेवक, कृषी, आरोग्य, शिक्षण, प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.