त्रिसंगमाच्या सीमा भागात बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 07:09 PM2020-12-12T19:09:19+5:302020-12-12T19:16:46+5:30
जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प्राण्यांना याचा फायदा होणार आहे.

जलपरिषदेच्या ह्यमिशन जलपरिषदह्ण १०१ वनराई बंधारा मोहीम हाती घेण्यात आली असून याद्वारे त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात येत आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यांच्या त्रिसंगमातील तालुका सीमावर्ती भागात तसेच भनवड, मोखनळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरवण, मोखनळ येथे ग्रामस्थांनी तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली असून दोन वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत.
यावेळी भनवड वनपरिक्षेत्राचे वन परिमंडळ अधिकारी एन. एन. गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक योगेश गवळी, दिनेश भोये, वनिता जाधव, सरपंच पुष्पा जाधव, उपसरपंच अरुण खांडवी, दत्तू ठेपणे, रेवनाथ मौळे, जनार्धन गांगोडे, जगन्नाथ जाधव, छगन जाधव, मोतीराम भुरकुड, गिरीधर शिंगाडे, मधुकर गायकवाड, दिलीप बागुल, ज्ञानेश्वर मौळे, योगीराज आचारी, तानाजी आलबाड, दत्तू गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.