तोरंगणला श्रमदानातून वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:20 AM2020-12-05T04:20:03+5:302020-12-05T04:20:03+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूलजवळील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच कमलताई बोरसे, ग्रामसेवक रतन बागुल ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूलजवळील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच कमलताई बोरसे, ग्रामसेवक रतन बागुल यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत ग्रामस्थांच्या मदतीने एक विस्तीर्ण वनराई बंधारा बांधला आहे.
सरपंच कमल बोरसे, ग्रामसेवक रतन बागुल आदींच्या मदतीने व जलसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली फुटीच्या ओहळात ग्रामस्थांच्या तसेच जलमित्रांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात जलपरिषदेचे ‘मिशन जलपरिषद’ वनराई बंधारा मोहीम हाती घेण्यात आली असून, तोरंगण ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. तोरंगण - वहांदरी रस्त्याला लागून असलेल्या फुटीच्या ओहळात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे.
यावेळी ग्रामसेवक रतन बागुल, हिंदुस्थान पेट्रोलियमचे डीलर मे.जे.एन. गायकवाड, संजय गायकवाड, उपसरपंच कमल बोरसे, काशीनाथ बोरसे, रोहिदास बोरसे, पवन बोरसे, रामदास बोरसे, मिथुन हिरकुड, अशोक गावीत, दिलीप पवार, दुर्गेश पवार, रोशन हिरकुड, काशीनाथ हिरकुड तसेच जलपरिषदेचे देवीदास कामडी, ग्रामपंचायत सदस्य अनिल बोरसे, पोपट महाले, हिरकुड, केशव पवार आदी उपस्थित होते.
छायाचित्र- ०४ त्र्यंबक बंधारा.
तोरंगण येथे वनराई बंधारा बांधताना सरपंच कमलताई बोरसे, ग्रामस्थ तसेच जलमित्र आदी.
===Photopath===
041220\04nsk_20_04122020_13.jpg
===Caption===
तोरंगण येथे वनराई बंधारा बांधतांना सरपंच सौ.कमलताई बोरसे, ग्रामस्थ तसेच जलमित्र आदी.